ताज्या घडामोडी

नागाळ्याची “ती” महिला तलाठी अडकली एसीबीच्या जाळ्यात

चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची धडक कारवाई

विनामुल्य होणा-या फेरफारसाठी गलेलठ्ठ पगार उचलणा-या प्रणालीने मागितली होती चक्क पाच हजार रुपयांची लाच

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

शेती संबंधातील खरेदी विक्री, वारसान ,हिस्से वाटनी , बॅंक बोझा , हक्क सोड , मृत्यूपत्र व अन्य फेरफार हे विनामुल्य करून तो रेकॉर्ड अद्यावत करण्याचे काम हे मुख्यतः पटवा-याचे असतांना देखिल अश्याच एका फेरफार कामासाठी एका महिला पटवा-याने चक्क पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.नंतर त्यात तडजोड होवून हा सौदा चार हजार रुपयांत पक्का झाला होता.पण मुळातच तक्रारदारास ही लाच संबंधित महिला तलाठ्यास देवून रेकार्ड दुरुस्तीचे काम करायचे नव्हते .शेवटी त्या तक्रारदाराने थेट चंद्रपूरचे एसीबी कार्यालय गाठून या लाचखोर महिला तलाठ्याची रितसर तक्रार नोंदवली.तक्रार मिळताच एसीबीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबतीत शहानिशा व खात्री केली. नंतर त्या महिला तलाठ्यास लाच घेताना आज रंगेहात पकडले .या महिला तलाठ्याचे नांव श्रीमती प्रणाली अनिलकुमार तुंडूरवार असे असल्याचे सांगितल्या जाते . ती चंद्रपूर येथील तहसिल कार्यालय अंतर्गत नागाळा साजा क्र. ४ ला कार्यरत होती .चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रचलेल्या सापळ्यात महिण्याकाठी गलेलठ्ठ पगार उचलणारी ही लाचखोर महिला कर्मचारी अडकली . एका पाठोपाठ जाळ्यात लटकणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील या लाचखोर कर्मचाऱ्यांची संख्या आता चारवर पोहचली आहे. या बाबत हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते कि एका तक्रारदाराला शेतजमिनीचा बक्षिस पत्रानुसार फेरफार करून रेकॉर्ड दुरुस्त करून घ्यायचा होता.त्या प्रमाणे विहीत नमुन्यातील कागद पत्रे जोडून त्यांनी अर्ज सादर केला होता .पण लाचेची हाव असणारी तलाठी ही मात्र फेरफार करण्यास टाळाटाळ करीत होती . या कामासाठी चक्क तिने ५ हजार रुपयांची लाच मागितली होती.तडजोडी नंतर हा सौदा चार हजार रुपयांत पक्का झाला होता.शेवटी प्रणालीचे नशिब फुटले व ती अलगद चंद्रपूर एसीबीच्या जाळ्यात अडकली .
उपरोक्त यशस्वी व धडाकेबाज कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे ,लाच प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील ,संदेश वाघमारे , पुष्पा काचोळे, प्रदीप ताडाम, वैभव घाडगे ,राकेश जांभुळकर , हिवराज नेवारे सतीश शिडाम , रामेश्वर पाल व पथकातील अन्य कर्मचा-यांनी केली.या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे .दरम्यान नागाळा येथील एसीबीच्या सदरहु धडाकेबाज कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close