शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना

कृषि उत्पन्न बाजार समिती पाथरी चा उपक्रम .
अल्प व्याजदरात सुलभ कर्ज योजना.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शेतकऱ्यांना आर्थिक हातभार देण्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती पाथरी च्या वतीने २०२१-२२ या हंगामातील उत्पादीत शेतमालावर शेतमाल तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली असुन अल्प व्याजदरात सुलभ कर्ज योजना सुरू केली आहे अशी माहिती कृऊबासचे सभापती अनिलराव नखाते यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांचा शेत माल सुरक्षित रहावा व योग्य भाव आल्यानंतर विक्री करता यावा यासाठी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भव्य अशा गोदाम ची उभारणी केली आहे.या योजनेअंतर्गत बाजार समितीच्या गोदामामध्ये सोयाबीन व ईतर धान्य शेतमाल ठेवल्यास वजन काटयावरील वजन पावतीवर एकुण वजनाचे त्या दिवसाचे बाजारभाव किंवा हमीभावा नुसार जो दर कमी असेल त्या दराने एकुण वजनावरील किंमतीवर ७५ टक्के दराने कर्ज ६ टक्के व्याज दराने एकुण १८० दिवसासाठी दिले जाईल.शेतमाल कर्जासाठी सोयाबीन हे सुकवून आणावा.याशिवाय इतर शेतमाल तुर, मुग, उडीद, चना इळद, ज्वारी, बाजरी, गहु इत्यादी शेतमाल हे मानवत येथील वखार महामंडळाचे पावतीवर तारण कर्ज देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी अद्यावत सातबारा, पिकपेरा उतारा, आधारकार्ड, शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर, वजन पावती किंवा वखार महामंडळाची पावती इत्यादी कागदपत्रासह कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अर्ज करावा व या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा असे अहवान सभापती अनिलराव नखाते यांनी केले आहे.
आ.बाबाजाणी दुर्राणी यांचे मार्गदर्शन , बाजार समिती प्रशासन व सर्व संचालक मंडळाच्या समन्वयातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या योजनांची येथे आंमलबजावणी होत असल्याने येथील प्रशासन आदर्शवत आहे.
चाळणी संचामुळे शेतकऱ्यांना मिळतोय अधिक भाव…
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मालाची योग्य चाळणी व्हावी या उद्देशाने चाळणीसंच कार्यान्वित केला आहे.या चाळणीसंचाद्वारे चाळणी केलेल्या शेतमालास बाजारात वाढीव भाव मिळत असल्याने हि सुविधा शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.