ताज्या घडामोडी
माताजी मार्केटिंग तर्फे मास्क चे वाटप
तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर मुल
मुल तालुक्यापासून 22 किलोमीटर अंतरावर व तालुक्याच्या शेवटच्या टोकावार असलेले नांदगांव येथे मोठी बाजारपेठ आहे. माताजी मार्केटिंगच्या वतीने तीन हजार आठशे पेक्षा जास्त मास्क वितरण करण्यात आले आहे. यावेळी माताजी मार्केटिंग कर्मचारी घरोघरी व सर्व दुकानात फिरून मास्क चे वाटप करीत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तर मोठ्या प्रमाणात उपाय योजना केल्या जात आहेत. त्यात माताजी मार्केटिंगचे संचालक आशिष चिलवेलवार यांनी सुद्धा सामाजिक बंधिलाकि जोपासत गावत व गावाशेजारील परिसरात 3800 पेक्षा जास्त मास्क चे वितरण केले आहे.
त्याच्या का कार्याची पंचक्रोशीत चर्चा सुरु आहे.