सिरोंचा तालुक्यात शिवसेनातर्फे शिवसंपर्क अभियान
जिल्हा प्रमुख रियाज शेख व पदाधिकाऱ्यांनी ‘गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ संकल्पना राबविले
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
हिंदूहृदय सम्राट व प्रेरणास्थान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना प्रमुख राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार , पूर्व विदर्भाचे संपर्कनेते खासदार गजानन कीर्तिकर, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथरावजी शिंदे, पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्या नेतृत्वाखाली सिरोंचा तालुक्यात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप यांच्या सहकार्याने शिवसेनेचे अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख व शिवसेना तालुका संघटक दुर्गेश तोकला यांच्या वतीने सिरोंचा तालुक्यातील व्येंकटापूर- जानमपल्ली जिल्हा परिषद मतदार संघात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले.
सदर जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत पंचायत समिती गणनिहाय बैठका घेण्यात आले. यात प्रामुख्याने व्येंकटापूर पंचायत समिती अंतर्गत व्येंकटापूर, गर्कपेठा, रंगय्यापल्ली, नारायणपूर, मेडाराम आदी तर जानंमपल्ली पंचायत समिती अंतर्गत जानंमपल्ली, रामंजापूर, आदीमुत्तापूर, नगरम, मद्दीकुंटा आदी ग्राम पंचायती व प्रामुख्याने गावांना भेटी देऊन शिवसंपर्क अभियान जिल्हा प्रमुख रियाज शेख व शिवसेनेच्या सिरोंचा तालुका पदाधिकाऱ्यांनी राबविले.
रियाज शेख यांनी, कोरोना निर्मूलनासाठी प्रत्येकांनी लस घ्यावी असे आवाहन करून शिवसैनिक व नागरिकांच्या घरी प्रत्यक्षात भेटी देऊन अडी-अडचणी व समस्या जाणून घेतले. विकासात्मक व विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून पक्ष संघटन व पक्ष बांधणी मजबुतीसाठी ‘गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ संकल्पना सुद्धा राबविले.
यावेळी शिवसेनेचे अमरादी येथील गणप्रमुख रघुनंदन जाडी, तालुका युवा सेना प्रमुख रुपेश नुकूम, ग्रामीण तालुका प्रमुख केशव नस्कुरी, तिरुपती नूसेटी, वॉर्ड प्रमुख प्रशांत नस्कुरी, चंदू मंथेना, विभाग प्रमुख राजशेखर भीमकरी, राजकुमार स्वामी नुकूम, उपशाखा प्रमुख जंपय्या चौधरी, शाखा प्रमुख व्येंकटेश कोमरी, साईकीरण कौटला, राजन्ना भंडारी, गणेश दामा, राजबापू निकुम, दामा रमेश, रामुलू दामा, येलय्या मोरे आदी शिवसैनिक सामील होते.