ताज्या घडामोडी

चिमुर क्रांती की कचरा क्रांती नगरपरिषद कडुन नदिच्या पात्रात डम्पिंग

नदी स्वच्छतेचे वाजले तिनतेरा —कवडू लोहकरे

मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे

चिमुर ही शहिदांच्या भुमी म्हणून देशात प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांना सळो की पळो करुन सोडण्यासाठी चिमूरच्या जनतेनी आपल्या रक्ताचा सळा पाडला. यामुळे चिमुर ही क्रांती भुमी म्हणून प्रसिद्ध आहे पण चिमुर नगरपरिषद कडुन उमा नदिच्या पात्रात डम्पिंग लावल्यामुळे चिमुर ही कचरा क्रांती म्हणून प्रसिद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वर्षापासुन उमा नदिच्या पात्रात डम्पिंग लावल्यामुळे उमा नदिचे पात्र प्रदुषित झाले आहे. त्यामुळे चिमुर वासीयांचा जिव धोक्यात आला आहे.

पर्यावरण संवर्धन समितीकडून अनेक निवेदन देण्यात आली पण नगरपरिषद कडुन पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली. नगरपरिषद ने चिमुर-कांपा रोडवर जागा घेऊन डम्पिंग लावल्यात आले पण पुर्वी चे नदिच्या पात्रातील मासळ – कोलारा रोडवरील डम्पिंग स्थलांतरीत न केल्याने त्या परिसरात दुर्गंधी व रोगराई पसरण्याच्या मार्गावर आहे. नगरपरिषद ने त्वरीत डम्पिंग न हटविल्या तिव्र आंदोलन करण्याचा इशारा पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया

“” वाघाची झलक पाहण्यासाठी अनेक देशी विदेशी पर्यटक याच मार्गानी जात असतांना” नाक” दाबुन जातात. तसेच डम्पिंग च्या परिसरात चावळी मोहल्लयात सध्या डेंगू चे रुग्ण आढळून आले आहे. “

कवडू लोहकरे
अध्यक्ष पर्यावरण संवर्धन समिती चिमुर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close