स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य पंचायत समिती वरोरा येथे विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रमात आमदार प्रतिभा धानोरकर व तहसीलदार रोशन मकवाने यांनी सुद्धा
देशभक्ती गीत गायन केले.
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
पंचायत समिती वरोरा अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव याचे औचित्य साधून पंचायत समिती वरोरा येथील सभागृहात 14 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण सह देशभक्तीपर रंगारंग या कार्यक्रमाचे आयोजन संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडशेलवार यांचे प्रमुख मार्गदर्शन व नेतृत्वात करण्यात आले होते.
यामध्ये देशभक्तीपर गीत गायन,नकला,इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मन लागो रे लागो रे,माझे गुरुभजनी या गीताने श्रोते मंत्रमुग्ध झाले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला .तहसीलदार रोशन मकवाने, यांनी सुद्धा गायन केले तसेच संवर्ग विकास अधिकारी संदीप
गोडशेलवार यांनी हर करम अपना करेंगे ,है वतन तेरे लिये,दिलं दिया जान भी देंगे व ए मेरे वतन के लोगो,ए।मेरे प्यारे वतन,मेरा कर्मा तू ही ही देशभक्तीपर गाणे गोड व सुमधुर आवाजात सादर केलीत .आणि सभागृहातील श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमात पंचायत विभागाच्या अधिकारी,कर्मचारी यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपापल्या कलागुणांचे सादरीकरण केले. आदिंनी देशभक्तीपर गीत गायन करून उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले.
कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी
चनफने,यांनी केले तर गटशिक्षणाधिकारी चहारे यांनी आभारप्रदर्शन केले.