ताज्या घडामोडी

उमेदतर्फे जिल्हा तसेच तालुकास्तरावर दिवाळी फराळ महोत्सव- 2022

बचतगटांचे उत्पादने खरेदीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन

प्रतिनिधी:हेमंत बोरकर खडसंगी

दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वंयसहायता समुहांनी उत्पादीत केलेले खादयपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे याची खरेदी करुन त्यांचा उत्साह आणि उत्पन्नात भर घालून ही दिवाळी अनोख्या पदधतीने साजरी करावी, असे आवाहन उमेद अभियानाचे जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केली आहे. यावर्षी सर्व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद परिसरात दिवाळी फराळ महोत्सव- 2022चे आयोजन केले जाणार आहे.
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हयात मोठया प्रमाणात स्वयंसहायता समुह कार्यरत असून, यातील अनेक महिला या नाविण्यपुर्ण वस्तूंची निर्मिती करीत असतात. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमिवर या महिलांकडून विविध स्वरुपाची खादयपदार्थ तयार केले जात आहेत. दिवाळीनिमित्त खादयपदार्थ व अनुषंगीक सजावटीच्या वस्तू नागरिकांनी खरेदी केल्यास त्याचा ग्रामीण भागातील महिलांना खूप फायदा होणार आहे. नुकेतच जिल्हा परिषद परिसरात झालेल्या प्रदर्शनाला चंद्रपूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता.
सर्व तालुकास्तरावर तसेच जिल्हा मुख्यालयात जिल्हा परिषद परिसरात दिवाळी फराळ महोत्सव साजरा केला जाणार असून, यात विविध साहित्य विक्रीस असणार आहे. एकमेकांना भेट देताना स्थानिक व ग्रामीण वस्तूचा वापर करावा, जेणेकरुन ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जॉन्सन तसेच जिल्हा अभियान सहसंचालक श्रीमती वर्षा गौरकार यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close