ताज्या घडामोडी
पळसगांव येथील बोडी खोलीकरण कामाला सुरुवात
पळसगांव येथील सरपंच सरिता विकास गुरनुले यांच्या हस्ते भूमिपूजन
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे
पळसगांव (पिपर्डा ) महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत पळसगांव येथील गांव शेतीतलाव लगत लागून असलेल्या बोडी चे खोलीकरण कामाला आज पासून सुरवात झाली असून पळसगांव येथील नवनिर्वाचित सरपंच सौ सरिता गुरनुले यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली,या कामामुळे बोडी लागत लागून असलेल्या शेतीच्या पाण्याची पातळी वाढेल .शिवारात पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी बोडीचे खोलीकरण अशी बहुविध कामे केली जात आहेत.या वेळी उपसरपंच तुळशीदास शेरकुरे,सर्व ग्राम पंचायत सदस्यगण ,ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग,व गावातील मजूर वर्ग उपस्थित होता.