ताज्या घडामोडी

वनविभाग शिवनी येथील रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी करण्याची दत्तात्रय समर्थ यांची मागणी

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्या अंतर्गत येत असलेल्या शिवणी वनपरिक्षेत्रातील रोखलेखा खर्च प्रमाणकेची एसीबी व आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा औद्योगिक काँग्रेस सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केली आहे.
दरम्यान या संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे या पूर्वीच एका लेखी निवेदनातून त्यांनी केली होती.उपरोक्त लेखी निवेदन त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्फत सादर केले होते. शिवनी येथील मुरलीधर गायकवाड यांनी समर्थ यांचे कडे सदरहु तक्रार सादर केली होती.त्या अनुषंगाने समर्थ यांनी चौकशीची मागणी केली आहे.उपरोक्त प्रकरणात सखोल चौकशी केल्यास गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांचे म्हणणे आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close