कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्षलागवड
ग्रामीण प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड
5 त्रिशरण एनलॉरमेंट फाउडेशन पुणेद्वारे विकास दुत प्रकल्पाअंतर्गत ( एक आठवण आपल्या दारी ) हा उपक्रम कोसंबी गवळी येथे राबविण्यात आला . यामध्ये कोरोना काळामध्ये तथा कोरोना आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दिनांक 14/07/2021 बुधवारला जिल्हा समन्वयक संदिप सुखदेवे तथा तालुका समन्वयक सचिन कालेश्वर यांच्या मार्गदर्शनात वृक्षरोपन करण्यात आले . यामध्ये श्री . श्रीहरी हेमने , राजेश्वर चौधरी सुधाकरजी लुटे , राघोजी दडमल , पंढरीजी रंधये , यांचे कोरोना काळात निधन झाले . त्यांच्या स्मरणार्थ जास्वंद , मोगरा , शेवंती , पपई , आवडा , गोडनिंब , आंबा , मनीप्लॉन्ट , इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली . या कार्यक्रमाला जि.प. सदस्य श्री . संजयभाऊ गजपुरे , श्री . धांदे सर मुख्याध्यापक शा.आ. शा . , पाटील वनरक्षक साहेब , श्री . दिलीपजी रंधये सरपंच , श्री . संदिपजी हेमने उपसरंपच तथा विकास दुत , श्री . मुळनकर ग्रामसेवक , श्री . भोयर सर जि.प. प्रा . शाळा , चव्हाण साहेब तलाठी , गिरी सर , श्री , कैलासजी रंधये ग्रा . प . सदस्य , श्रीमती ज्योतीताई उईके ग्रा . प . सदस्य , सौ . शिल्पा धोंगडे ग्रा . प . सदस्य , श्रीमती . चतुराबाई दडमल अंगणवाडी सेविका , सौ . रूपा दडमल अंगणवाडी सेविका , विजय उईके , मच्छिंद्रजी चंन्नोळे , गुरूदेवजी नागापुरे तसेच मृतकांच्या कुटुंबातील सदस्य , कार्यक्रमाला उपस्थित होते .