चिमुर क्रांती भुमीमध्ये स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन क्रांती महा डिजीटल असोशियेशन चिमुर ची कार्यकारणी गठीत
ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी
चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात येनाऱ्या समस्त गोरगरीब अन्यायग्रस्त शोषीत पिडीत जनतेच्या समस्यांवर वाचा फोडन्या करीता व अन्यायाविरुद्ध न्याय मीळऊन देन्या करीत जनतेच्या हितासाठी तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक मिडीया एकवटली आहे.आज स्वतंत्र दिनाचे औचित्य साधुन चिमुर तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मिडीया यांनी जनतेच्या हितासाठी प्रतिबद्ध होऊन कार्यकारनी गठीत करण्यात आली यावेळी ब्रिद वाक्य बोलून “हाक तुमची साथ आमची” असे जनतेला आव्हान करण्यात आले व सभा संपन्न झाली.
यामध्ये अध्यक्ष जावेद पठाण , उपाध्यक्ष रोशन जुमडे , सचिव विलास मोहिणकर , सहसचिव सुनिल कोसे , कोषाध्यक्ष विशाल इन्दोरकर , सल्लागार प्रशांत डवले यांची निवड करण्यात आली व या सभेमध्ये उपस्थित मंगेश शेंडे , प्रशांत रामटेके , सुनील हिंगणकर , जयंता कामडी , प्रविण वाघे , आणि समिधा भैसारे , कल्याणी मुनघाटे व अन्य सदस्य उपस्थित होते.