आचार्य पदवी प्राप्त अल्का ठाकरेंचा चंद्रपूरात सत्कार
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपूर तुकुम स्थित मराठा सेवा संघ नागरी सहकारी पत संस्थेच्या उपाध्यक्षा अल्का ठाकरे -जेऊरकर यांनी नुकतीच आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या अध्यक्षा स्मिताताई ठाकरे ,संचालक इंजिनिअर विलास आस्वले, संचालक दिपक जेऊरकर, संचालक सुरेश माळवे, एकनाथ ढुमणे, संचालक रामास्वामी कापरबोयना यांच्या हस्ते पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन आज सत्कार करण्यात आला. आचार्य ही पदवी प्राप्त केल्याबद्दल अनेकांनी ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.
चंद्रपूर येथील मुळ रहीवाशी अल्का ठाकरे यांनी “ग्रामीण भागातील विद्यार्थीनींच्या शैक्षणिक अभिरूची आणि त्यांना शिक्षणाच्या विविध स्तरांवर येणाऱ्या अडचणीचे चिकित्सक अध्ययन” या विषयावर शोध प्रबंधक लिहिला होता .दरम्यान त्यांना या वेळी जनता शिक्षणशास्त्र महाविद्यालय चंद्रपूरचे डॉ .गणेश पेटकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे खुद्द अल्का ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आयोजित सत्कार कार्यक्रमाला पत संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.