गोरेगाव तालुक्यातील सोनी जिल्हा परिषद क्षेत्रातील होणाऱ्या निवडणुकीचा बहिष्कार करणार शेतकरी
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
सोनी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी महिलांनी सांगितलें की आमच्या सोनी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी महिलांनी जी मागणी केली ती जो पर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचा बहिष्कार होत राहणार.
शेतकरी महिलांची मागण्या खालील प्रमाणे आहेत.
१ ) २४ तास शेतीला विद्युत पुरवठा . २ ) ज्यांनी डिमांड भरले त्यांना त्वरित कनेक्शन देण्यात यावे . ३) मागिल थकबाकी बिना रिडिंग असल्यामुळे ती व्याजासह माफ करावी . ४ ) शेती पंपाला वार्षिक सरासरी बिल मध्यप्रदेश प्रमाणे ६००० रू . देण्यात यावे . ५ ) ज्यांनी अर्ज केले त्यांना डिमांड देउन कनेक्शन देण्यात यावे . या वरील मागण्या मंजूर झाल्याशिवाय आमचे क्षेत्रातील २००० विद्युत पंपधारक शेतकन्यांचा होणाऱ्या झेड.पी. व बी.डी.सी. निवडणुकीवर बहिष्कार राहिल . याची दखल देउन शासनातील पदाधिकारी , मुख्यमंत्री , उर्जामंत्री , पालकमंत्री , खासदार , आमदार या कडे लक्ष देउन शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावावे असे निवेदन सोनी जी.प. श्रेत्रातील सर्व पक्षीय शेतकरी यांनी दिला.
यावेळी
शेतकरी भूमेश्वर कारू चव्हाण,काशीराम पटले,कैलास बिसेन,खोपचंद पटले,मेघश्याम पटले,रवि शंकर पटले,सिताराम पटले,भोजू पटले,टी. बी. फुनडे,चंद्रशेखर फुंडे,दिवाकर भगत,कवीभाऊ मुंडे,भाऊलाल गौतम,लोकचंद पटले,संदीप पटले,दोवालाल बोपचे,डॉक्टर नारायण पटले,कमलेश पटले, नारायण बघेले,अश्विनी पटले, तिलक जी पटले सौ. प्रेमलाताबई पटले, सौ. लक्ष्मीबाई पटले, सौ. कांताबाई घारपिंडे, सौ इंद्रकांता बाई बिसेन, सौ. शेवंताबाई चौहान, सौ. हेमलता बाई चौहान व सर्व शेतकरी महीला उपस्थित होत्या.