ताज्या घडामोडी

75 वा स्वातंत्र दिन आनंद निकेतन महाविद्यालयात साजरा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय , माध्यमिक विद्यालय ,अंध विद्यालय , मूक बधिर विद्यालय , संधी निकेतन अपंग कर्मशाळे चे प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच एन.सी.सी छात्रसैनिक, खेळाडू ,एन.एस.एस स्वयंसेवक व महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच आनंदवन संस्थेतील कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दिनांक 15 ऑगस्ट2022 रोजी सकाळी ठीक ८.००वाजता आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ ,म.से.स , विश्वस्त श्री.सुधाकर कडू गुरुजी म.से.स , ज्येष्ठ कार्यकर्ते माधव कवीश्वर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सर्व जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.ध्वजारोहणाचा कार्यक्रम लेफ्टनंट लता वामनराव आत्राम ए .एन. ओ ३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी.सी नागपूर व लेफ्टनंट संदीप पारखी ए.एन.ओ , 21 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी वर्धा व एन.सी.सी कॅडेट्स यांच्या पथसंचलनात संपन्न झाला. प्राचार्य डॉक्टर मृणाल काळे यांनी याप्रसंगी उपस्थित सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्वतंत्रता लढ्यातील वीर शहिदांचे स्मरण करत विद्यार्थ्यांनी देशाच्या भविष्यासाठी चांगले कार्य करण्याचा उपदेशही दिला तसेच एन.सी.सी च्या छात्र सैनिकांना एन.सी.सी ची शपथ दिली.या कार्यक्रमात वर्षभरात एन.सी.सी.छात्रसैनिकांचा एन.एस.एस स्वयंसेवकांचा व विद्यापीठात गुणवत्ता यादीत येणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, प्राध्यापक मेजर डॉ. चंद्रभान जीवने( माजी ए.एन.ओ, २१ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी, वर्धा ), जेष्ठ प्रा.डॉ.रंजना लाड, व एन. एस. एस विभाग अधिकारी डॉ.नरेंद्र पाटील ह्याच्या हस्ते पदक, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.तानाजी वि.बायस्कर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close