ताज्या घडामोडी

अकोला येथे राज्यस्तर स्वयंसिद्धा महिला संरक्षण प्रशिक्षणाचा समारोप

चंहपुर जिल्ह्यातील दहा युवतींचा सहभाग .

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग अमरावती , अमरावती-अकोला जिल्हा स्वयंसिद्धा असोसिएशन व महाराष्ट्र स्वयंसिद्धा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ दीक्षांत सभागृह अकोला येथे राज्यस्तर स्वयंसिद्धा महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे ७ मे ते १० मे दरम्यान आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये महिला, युवती व महाविद्यालयिन विद्यार्थिनींना ज्युडो, कराटे , लाठीकाठी, ॲरोबिक्स , तायकांडो, योगा अशाप्रकारे आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

१० मे रोजी प्रशिक्षण समारोप कार्यक्रमास क्रीडा व युवक सेवा संचालनालय अमरावती विभागाचे उपसंचालक विजय संतान यांनी अध्यक्षपद भूषविले. त्यांनी स्वयंसिद्धाच्या योजना व प्रशिक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी सौ सुहासिनीताई धोत्रे यांनी महिला व मुलींनी स्वयंसिद्धाचे धडे शिकून स्वतःचे संरक्षण करावे असे म्हटले व अशा प्रकारचे प्रशिक्षण गौरवास्पद असल्याचे मत व्यक्त केले. अतिथी, विदर्भ साहित्य सम्मेलनाच्या वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नागपूरच्या विजया मारोतकार यांनी ‘पोरी जरा जपून’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मंचावर सामाजिक कार्यकर्त्या निकिता देशमुख, प्रशिक्षणाचे आयोजक महाराष्ट्र अमॅच्युअर कराटे असोसिएशन चे अध्यक्ष शिहान अरुण सारवान , महाराष्ट्र अमॅच्युअर कराटे असोसिएशन चे महासचिव वासुदेव वाघ पाटील , स्वयंसिद्धा महाराष्ट्र राज्य प्रमुख मास्टर ट्रेनर , नागपूर – अमरावती विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र शासन युथ अवॉर्ड पुरस्कारार्थी डॉ खुशबू चोपडे, तसेच स्वयंसिद्धा चे विभाग प्रमुख सुनीता पाटील कोल्हापूर, तपस्वी गोंधळी मुंबई, लिमा काळे पुणे, रोहिणी बनसोडे , सुरेखा गिरी लातूर, सरिता येलपूल्ला संभाजीनगर, पूनम घुगे नाशिक आणि संयोजक वासुदेव वाघ पाटील यांची उपस्थिती होती

स्वयंसिद्धा महाराष्ट्र राज्य प्रमुख मास्टर ट्रेनर , नागपूर – अमरावती विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र शासन युथ अवॉर्ड पुरस्कारार्थी डॉ खुशबू चोपडे, यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हाप्रमुख महाराष्ट्र शासन आदिवासी रत्न पुरस्कारार्थी कु.श्रध्दा किन्नाके यांच्या उपस्थितीत चंद्रपुर जिल्ह्यातील दीपिका घरात, विद्या गजभे, जयश्री चिकराम, संजीवनी कुळमेथे, रितू मडावी, अंजली नन्नावरे, सानिका कुमरे, वंशिका कुसराम व रोहिणी वाघमारे आदि युवतींनी शिबिराच्या माध्यमातून आत्मरक्षणाचे धडे घेतले. हे प्रशिक्षण खूपच महत्वाचे वाटले असे त्यांचे मत आहे. या शिबिरात महाराष्ट्रातून आठ विभागातील ३६० प्रशिक्षणार्थी आणि २० प्रशिक्षक यांचा सहभाग होता.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close