ताज्या घडामोडी
गजानन मुळे यांचा पुरात वाहून गेला बैल
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली तात्काळ आर्थिक मदत.
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी अडेगाव (देश ) येथील गजानन मुळे यांचा बैल पुरात वाहून गेल्यामुळे तात्काळ आर्थिक मदत दिली.
ऐन शेती च्या हंगामात अतिवृष्टी पडल्या मुळे नदी च्या पुरात गजानन मुळे यांचा बैल वाहून गेला. बैल मृत्यू झाल्याने त्यांचे वर आर्थिक संकट आहे. सदर माहिती आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना मिळताच त्यांनी आर्थिक मदत दिली.
आर्थिक मदत सुपूर्द करीत असताना भाजप चे असिफ शेख, सरपंच गजानन गुळधे, रमेशजी कंचर्लावार, सागर भागवतकर, उपसरपंच संजय चौधरी, बूथ अध्यक्ष अंकुश डाहुले,राकेश भोयर, रंगराज चौखे व ग्रामवासी उपस्थित होते.