ताज्या घडामोडी

काळा घोडा येथे ‘क्रिएटिव्ह व्हिजन’ समूह प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ

परभणीच्या काका सुशीलकुमार यांच्यासह २० कलाकारांच्या कलाकृतींचा संगम

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

रेनबो आर्ट ग्रुप आयोजित बहुचर्चित ‘क्रिएटिव्ह व्हिजन’ समूह चित्र प्रदर्शन मंगळवार दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजता मुंबईच्या कला-संस्कृतीचे माहेरघर असलेल्या आर्टिस्ट सेंटर, आर्मी अँड नेव्ही बिल्डिंग, काळा घोडा, फोर्ट येथे दिमाखात उद्घाटन सोहळा पार पडला.


चित्रकला, रेखाचित्र, ग्राफिक्स, छायाचित्रण आणि संगणकीय कला अशा पाचही कलाप्रकारांचा अद्भुत संगम या एकाच छताखाली अनुभवायला मिळणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन कला व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय भिडे (ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स), प्रा. अनिल नाईक (माजी विभाग प्रमुख, सर जे. जे. कला महाविद्यालय), श्री. प्रकाश बाळ जोशी (ज्येष्ठ चित्रकार व पत्रकार),श्री. राजेंद्र पाटील (संचालक, इंडिया आर्ट फेस्टिव्हल), पद्मश्री सुधराक ओलवे (प्रसिद्ध छायाचित्र पत्रकार), प्रा. पठारे ज्योत्स्ना विनोद (माजी प्राचार्य, राहेजा कला महाविद्यालय) आणि डॉ. दीपक खांडेकर (अभिनेते, लेखक) उपस्थित होते.
देशभरातील २० नामवंत कलाकारांचा सहभाग – मराठवाड्याचा अभिमान
या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात देशभरातून निवडक २० कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये परभणीचे सुपुत्र काका सुशीलकुमार जी.(सुशील एन. घुंबरे) यांचाही समावेश असून त्यांनी मराठवाड्याच्या शेतमातीचा ठसा पुन्हा एकदा मुंबईच्या ताजनगरीत उमटवला आहे.
या प्रदर्शनाक सहभागी कलाकार पुढीलप्रमाणे बिस्वज्योती पाठक, चंद्रशेखर भट, दिनेश कुमार, दिव्या खानेजा, डॉ. तपस कुमार जाना, काका सुशीलकुमार जी., लता साहू, महेंद्र एस. शेंद्रे, नीलू पटेल, नितीन कुलकर्णी, राजेंद्र दिंडोरकर, रीना जैन, रेखा कुमारी, सपना केदिया, शिल्पा, शिरीष जोगलेकर, सोना कपूर हैदर, टेल्स्लीन ऑगस्टीन, विरेंद्र कुमार आणि यशिका धाबरे.
हे प्रदर्शन दि. २२ ते २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व कला रसिकांसाठी खुले राहणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *