ताज्या घडामोडी

दुष्काळसदृश संकटात शेतकऱ्यांच्या बांधावर पालकमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर

पिकांची केली पाहणी, शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा

संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर: हिम्मत खचू देऊ नका

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी पिकांवर आलेले संकट आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हिम्मत खचू देऊ नका, असा धीर दिला.
कुंडी, ता. सेलू येथील छायाचित्र..!
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close