तख़रीरी व तहरीरी उर्स सांस्कृतिक कमिटी संयोजक पदी पत्रकार महेमूद खान यांची नियुक्ति
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
संभाजीनगर: राष्ट्रीय एकात्मता के प्रतिक सूफीसंत हज़रत सय्यद शाह तुराबल हक्क परभणी यांच्या उर्स यात्रा निमित्त तख़रीरी व तहरीरी (वक्तृत्व स्पर्धा) या शैक्षिक व सांस्कृतिक कार्यक्रम उर्स कमेटीच्या संयोजक पदी जलजनसह्योग सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक दौर ए इंकलाब चे जिल्हा प्रतिनीधी महेमूद खान यांची नियुक्ति करण्यात आली आहे। परभणी जिल्हा वक्फ बोर्ड यांच्या वतीने 28 जानेवारी 2025 रोजी नियुक्त पत्र देऊन नियुक्ति केली. दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही कवाली,मुशायरा,गझल,सूफी संगीत,नशरो ईशात माहिती व प्रसिद्धी पुस्तिका,तखरीरी व तहरीरी मुकाबले,बॉडी बिल्डिंग,कुशती,मॅरॅथॉन,बजम ए ख्वातीन,नाते शरीफ,क्रिकेट,फुटबॉल, व्वालीबॉल स्पर्धा सारखे असे विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात तखरिरी व तहरिरी मुकाबले (,वक्तृत्व स्पर्धा) या शैक्षिक कार्यक्रमाच्या संयोजक पदी पत्रकार महेमुद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.