ताज्या घडामोडी

विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही.- आ.गुट्टे

आमदार गुट्टे यांच्या हस्ते पूर्णा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

२०२१-२२ आमदार स्थानिक विकास निधी मधून मौजे माखणी ता. पूर्णा येथे १० लक्ष रुपयांच्या निधीतून सभामंडप बांधकाम करण्यात येणार असून त्या कामाचे भूमिपूजन व सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी पुरहानी दुरुस्ती योजने अंतर्गत राहटी-उखळद- मिरखेल-वरपुड-माखणी प्रजिमा १४ ता. पूर्णा किमी २१/०५०,२१/४०० व २१/५०० मध्ये नळकांडी पुलाचे बांधकाम करणे या ४१ लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मौजे देऊळगाव दुधाटे ता. पूर्णा येथे आमदार स्थानिक विकास निधी मधून बांधण्यात आलेल्या सिमेंट रोड व नाली बांधकामाचे लोकार्पण व सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी अंतर्गत देऊळगाव दुधाटे ते खडाळा रोड VR-७५ प्रजिमा ०/४०० मधे पूलाचे नवीन बांधकाम करणे या १७७ लक्ष रुपये विकास कामाचे भूमिपूजन आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. मौजे पिंपळगाव (बा.) तेथे जागृत देवस्थान हनुमान मंदिरासमोर आमदार स्थानिक विकास निधी मधून बांधण्यात येणाऱ्या १० लक्ष रुपयांच्या सभामंडप बांधकामाचे व मौजे चुडावा येथे ओड समाजाकरिता ९ लक्ष रुपये किमतीच्या सांस्कृतिक सभागृहाचे बांधकामाचे तसेच मौजे धनगर टाकळी येथे १० लक्ष रुपये किमतीच्या सभामंडपाच्या बांधकाचे भूमिपूजन आमदार गुट्टे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना परभणी अंतर्गत पालम तालुक्यातील मौजे सायळा ते उमरथडी इजिमा १६ किमी ०/०० ते ४/२०० या रस्त्याची २६९.९६ लक्ष रुपये विकास कामाचे भूमिपूजन आ.गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.समस्त गावकऱ्यांच्या वतीने आमदार गुट्टे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी गंगाखेड विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके,गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे,माधवराव गायकवाड,पूर्णा तालुका अध्यक्ष गणेश कदम,पूर्णा रासप तालुकाध्यक्ष जगन्नाथ रेनगडे, पालम तालुका अध्यक्ष नारायण तात्या दुधाटे,कैलास काळे,सरपंच गोविंदराव आवरगंड, गणेशराव गाढवे, सुदाम वाघमारे, मारोती मोहिते, नवनाथजी आवरगंड, बाबुरावजी आवरगंड, शिवाजी आवरगंड,इंद्रजित आवरगंड,अशोक काका आवरगंड, ज्ञानोबा बोबडे, चांदाजी आवरगंड, विष्णु आवरगंड, शिवाजी दादा आवरगंड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मौजे देऊळगाव (दुधाटे) ता. पूर्णा येथील कार्यक्रमास वरील प्रमुख पाहुण्यांसह सरपंच ललिताबाई कांबळे, प्रा. शोभाताई दुधाटे, उपसरपंच दिगंबरराव दुधाटे, रंगनाथ दादा दुधाटे, भगवानराव दुधाटे,शिवाजी दुधाटे, व्यंकटराव गबाळे, अशोक दुधाटे,उद्धवराव दुधाटे,दिनकर दुधाटे, भुजंग दुधाटे, पांडुरंग दुधाटे गणेशराव गाढवे, मारोती मोहिते,शिवाजी आवरगंड, शरद जोगदंड, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close