ताज्या घडामोडी

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी आनंदसिंह बैस

जिल्हा प्रतिनिधी:संजय नागदेवे

अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी आनंदसिंह प्रतापसिंह बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासभेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेल्या या जबाबदारीमुळे गोंदिया जिल्ह्यातील क्षत्रिय समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नियुक्तीचे समाज


बांधवांकडून स्वागत करण्यात येत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, सामाजिक सलोखा आणि ऐक्य वाढविणे, युवकांना संघटित करणे तसेच समाजोपयोगी उपक्रमांना चालना देणे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आनंदसिंह बैस यांच्यावर सोपविण्यात आल्याने जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन संघटनेचा विस्तार करण्यास प्राधान्य देणार असल्याचे आनंदसिंह बैस यांनी सांगितले. समाजातील एकोपा मजबूत करणे, युवकांना शिक्षण व सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित करणे, गरजू घटकांना आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबविणे यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *