ताज्या घडामोडी

रेखा मनेरे यांना शहीद भगतसिंग योध्दा राष्ट्रीय पुरस्कार 2026 या पुरस्काराने सन्मानित

रेखा मनेरे यांना शहीद भगतसिंग योध्दा राष्ट्रीय पुरस्कार 2026 या पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई मनेरे यांचा गौरव

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी

सविस्तर वृत्त असे की लातूर येथे अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळा व १६ वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक १७/१८ सप्टेंबर रोजी प्रणव श्रीमंगल कार्यालय लातूर येथे संपन्न झाले या अधिवेशनामध्ये निजामाच्या गुलामगिरीतून मराठवाडा मुक्त करून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिल त्या थोर वीर महापुरुषांच्या वीरपत्नी, वीरमातां, वीरपिता, व त्यांच्या परिवारांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान व गौरव करण्यात आला.

या दिमागदार सोहळ्यामध्ये संपूर्ण देशामधून आलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला २०२५/२० २६ या वर्षांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला/ पुरुष कार्यकर्त्यांनी काम करीत असताना सामाजिक सलोखा जोपासून समाजकार्यासाठी सेवा करत असताना अमुल्य योगदान दिले त्याचबरोबर सर्व घटकातील महिलांना पिडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे काम केलं त्या पदाधिकाऱ्यांचा शहीद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे राहत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा परभणी जिल्हा महिला अध्यक्षा मा.सौ.रेखाताई मनेरे यांनी संघटनेच्या माध्यमातून पिडित महिलांना न्याय मिळवून दिला संघटनेच्या कामाला गती दिली संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं व दारूबंदी , व्यसनमुक्ती, शेतकरी बांधवांना दुष्काळ जाहीर करावा असे अनेक प्रश्न, प्रशासन विभाग यांच्या कडे निवेदन, आंदोलन, विभागीय बैठका, मोर्चा मध्ये हिरहिरीने सहभाग घेतला, अन्या विरूद्ध आवाज उठवला, त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या शिफारशीनुसार रेखाताई मनेरे यांना शहीद भगतसिंग योध्दा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे..? या दोन दिवस व राष्ट्रीय अधिवेशनास राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख राष्ट्रीय सरचिटणीस अमोलजी नानाजकर राष्ट्रीय सरचिटणीस राजू पाटील सिपांळकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्र पाटील प्रदेशाध्यक्ष अँड राणीताई स्वामी प्रदेश अध्यक्ष , झारखंड अध्यक्षा अरविंद कौर निवड कमिटी अध्यक्ष अनिल दादा देसले प्रदेश अध्यक्ष सैनिक विभाग उल्हास दादा पाटील हितेश दाभाडे, सुनिल जाधव, योगिता ठाकुर, गोकुळसिंग राजपूत मराठवाडा विभागीय अध्यक्ष, व काशीबाई, यासह अनेक मान्यवराच्या शुभ हस्ते सामाजिक कार्यकर्तेत्या मा.सौ.रेखाताई मनेरे यांना शहीद भगतसिंग योध्दा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला शहीद चंद्रशखर आझाद यांचे नातू अमित तिवारी यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमात 16 वे राष्ट्रीय अधिवेशनात लातूर येथे शहीद भगतसिंग राष्ट्रीय योद्धा पुरस्कार २०२६ यांच्या हस्ते देऊन रेखा मनेरे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कैलास पंडित शहर अध्यक्ष परभणी, तालुका अध्यक्ष परभणी सचिन कोकणे, शहर संघटक सौ.अंतिका सिताराम वाघमारे सौ.आशामती मुरली वाव्हुळे, शंकरराव देशमुख, उपस्थित होते जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्यांच्या कार्याचे अभिनंदन होत आहे व परभणी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांनी रेखा मनेरे यांना शहीद भगतसिंग योध्दा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल रेखा मनेरे यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. लातूर येथे १६ वे राष्ट्रीय अधिवेशनात हा पुरस्कार लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमात १७ व १८ सप्टेंबर रोजी २०२६ वा शहीद भगतसिंग राष्ट्रीय योद्धा पुरस्कार २०२६ शहीद चंद्रशखर आझाद यांचे नातू अमित तिवारी यांच्या हस्ते परभणी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्तेत्या तथा दैनिक कलमवीर वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी रेखा मनेरे यांना देण्यात आला त्यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *