रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

प्रतिनिधी:हेमंत बोरकर
जनता जनार्दन गणेश मंडळ, नेताजी वॉर्ड चिमुर सेवा संकल्प अभियान अंतर्गत गणपती उत्सवाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
”रुग्णाचे वाचवी प्राण म्हणूनच रक्तदान हेच श्रेष्ठदान”
या शिबिराला नागरिक, गणेशभक्त, युवक तसेच महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीस रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
सदर रक्तदान शिबिर करीता विशेष सहकार्य म्हणून डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आयोजकांच्या वतीने रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले. गणपती उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा जपल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष सचिन गायधनी, सचिव मयुर देशमुख व आयोजक मंडळाचे कार्यकर्ते, वैद्यकीय पथक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.








