पाथरी विधानसभा निवडणूक आज होणार अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट…
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
98 पाथरी विधानसभा निवडणूक साठी एकूण 47 उमेदवारांचे 65 उमेदवारी अर्ज शिल्लक असून अर्ज मागे घेण्यासाठी आज दिनांक 4 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ची अंतिम वेळ आहे.यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फक्त पाचच तास वेळ शिल्लक असल्याने अर्ज दाखल केलेल्या उमेदवार यांना धावपळ करावी लागणार आहे.दुपारी 3 वाजता 98 पाथरी विधानसभा निवडणूक अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.अंतिम उमेदवार निश्चित झाल्यानंतर आजच नोंदणीकृत मान्यता प्राप्त राजकीय पक्ष यांना त्यांचे निवडणूक आयोगाने निश्चित केलेले चिन्ह मिळेल व राजकीय पक्षांचे उमेदवार व्यतिरिक्त इतर अपक्ष उमेदवार यांनाही ज्यांची प्रथम मागणी त्यांना प्रथम प्राधान्य यानुसारच त्यांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे याचं दिवशी पक्ष निहाय चिन्हनिहाय अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे अशी माहिती 98 पाथरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी श्री शैलेश लाहोटी यांनी दिली आहे.
प