ताज्या घडामोडी

उद्धव इंगळे यांची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी

पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथे दि.३/१०/२२ सोमवार रोजी सर्व पालकांची पालक सभा घेण्यात आली.
यावेळी शासन नियमानुसार निवडणूक घेण्यात आली व अध्यक्ष पदी उध्दव नामदेवराव इंगळे यांची तर उपाध्यक्षपदी दिगंबर हारकळ यांची निवड करण्यात आली .
उध्दव इंगळे यांची शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात असलेली आवड तसेच आपल्या पत्रकारितेतुन गावातील समस्या सतत मांडत असतात .त्यांच्या सामाजिक कामात असलेल्या उत्साहामुळे सर्व पालकांनी त्यांची रेणाखळी जि. प.मराठी प्रशालेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली
निवडलेली समिती…
१ ) उध्दव नामदेवराव इंगळे… अध्यक्ष
२ ) दिगंबर लक्ष्मण हारकळ…. उपाध्यक्ष
३) कांता परमेश्वर ताल्डे
४) प्रभाकर गणेश ताल्डे
५) अरुणा भिमराव हारकळ
६) जनाबाई बळीराम क्षिरसागर
७) परमेश्वर नबाजी हारकळ
८) गोदावरी रामेश्वर देपाळे
९)शितल राजेभाऊ हारकळ
१०) निर्मला अर्जुन इंगळे
११) राहुल नामदेवराव ठेंगे
१२) सुभाष मुक्तीराम हारकळ
१३) सुनील सर्जेराव घोगरे शिक्षण तज्ञ
१४) श्री पवार एन.एल शिक्षक सदस्य
निवडण्यात आलेल्या सर्व सदस्यांचे सरपंच राहुल ब्रम्हराक्षे व मुख्याध्यापक श्री तांबुळी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले या प्रसंगी सरपंच राहुल ब्रम्हराक्षे व अध्यक्ष उद्धव इंगळे यांनी रेणाखळी येथील शाळा ही जिल्ह्यात एक नंबर शाळा करू व मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी भरपूर प्रयत्न करू असे मनोगत व्यक्त करून पालकांचे आभार मानले
याप्रसंगी गावातील सर्व पालकांची,ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
शाळेतील सर्व शिक्षकवृंदानी परिश्रम घेऊन शालेय व्यवस्थापन समिती निवडीचा कार्यक्रम शिस्तबद्ध व शांततेत पार पाडला .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close