ताज्या घडामोडी

कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिसदादांना २ महिन्याचे अतिरिक्त वेतन द्या

पोलिसांच्या सेवेत मानोसोपचार तज्ञांची नेमणूक करा.

पोलीस स्टेशन परिसरात निवासाची व्यवस्था करा.

लोकप्रतिनिधींवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करणाऱ्या पोलीस दलाचे केले कौतुक.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची विधानसभेत मागणी

ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुरानकर खेमजई वरोरा

वरोरा :महाविकास आघाडी सरकार हे जनसामान्यांचे सरकार आहे. महिलांच्या विषयावर हे सरकार भक्कमपणे काम करीत असल्याचे शक्ती कायद्याच्या निमित्याने दिसून आले आहे. त्यासोबतच पोलीस दलातील अन्य मागण्या त्वरित पूर्ण करण्याच्या लोकहितकारी मागण्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत केल्या आहे.
पोलीस कामावर असतांना मोठ्या प्रमाणात तणावात असतात. कौटुंबिक व पोलीस दलाची कामगिरी त्यांच्या खांद्यावर असते. त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी मानसिक आजारी असल्याचे अनेक अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे पूर्णवेळ पोलिसांच्या सेवेत मानोसोपचार तज्ज्ञांची नेमणूक करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत केली. पोलीस स्टेशन परिसरात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी योग्य रित्या पार पाडण्याकरिता पोलीस स्टेशन परिसरात निवासाची व्यवस्था करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
पोलीस विभागाला कायदा व सुव्यवस्था आणखी बळकटी आणण्यासाठी तात्काळ पोलीस भरती करावी व पोलीस विभागाने कोरोना कालावधीत अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत कर्मचाऱ्यांना २ महिन्याचे अतिरिक्त वेतन देण्याची मागणी त्यांनी केली.
त्यासोबतच गृह विभागाने पोलिसांच्या पदोन्नती तसेच पोलीस विभागामार्फत महिला पोलिसांना फक्त आठ तास सेवा देऊन त्यांचे मानसिक स्वास्थ जपण्याचा निर्णयाचे देखील त्यांनी स्वागत केले. त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील मुली मोठ्या प्रमाणात बेपत्ता होत होत्या. त्या परत आणण्यात मोठे यास पोलीस दलाला मिळाले आहे. तसेच चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत नगरसेवक नंदू नगरकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले. या कामगिरीचे कौतुक त्यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close