ताज्या घडामोडी

आलापल्लीत वनहुतात्मा दिन साजरा

स्मारकाचे थाटात उदघाटन

स्मारकाने हुतात्मे चिरस्थायी ठरतात
आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

सदैव स्मरणात राहण्यासाठी स्मारक अत्यावश्यक असून स्मारक असले की, हुतात्मे कायमस्वरूपी चिरस्थायी ठरतात असे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते आलापल्ली येथील वनसंपदा इमारतीच्या दालनात शनिवार 11 सप्टेंबर रोजी वन हुतात्मा स्मारक उदघाटन सोहळ्यात विशेष अतिथीच्या स्थानावरून बोलत होते.
यावेळी मंचावर उदघाटक म्हणून खासदार अशोक नेते होते. तर अध्यक्षस्थानी अप्पर प्रधान वनसंरक्षक एम.श्रीनिवास राव होते. प्रमुख अतिथी म्हणून वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार, सरपंच शंकर मेश्राम, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, आलापल्ली येथील उपवनसंरक्षक सी.आर.तांबे, सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार, भामरागडचे आशिष पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना आ.धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, आदिवासी व जंगलाचे अतूट नाते असून ‘जंगल म्हटले की आदिवासी व आदिवासी म्हटले की जंगल’ हे सूत्रच असून जंगलाला वाचविण्याचे पहिले व आद्यकर्तव्य आदिवासी बांधवांचे असून वनसेवा देत असताना प्राणाची आहुती देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहून हुतात्मा स्मारकाच्या विकासकामांसाठी व वनखात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अन्य सोयी-सवलती, सुविधा उपलब्धतेसाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले व पुढे, वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरण व बद्दलीसाठी पसंतीच्या ठिकाणी बद्दली व्हावी यासाठीसुद्धा यथोचित प्रयत्न करणार असल्याचे आवर्जून सांगितले.आणि वनांचे रक्षण झाले तर पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही व निसर्गाचे संतुलन बिघडत नाही, निसर्गाचे संतुलन व्यवस्थित असले की ऋतुचक्र व्यवस्थित असते असे म्हणत वनांचे महत्त्व यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पटवून दिले.
याचवेळी खासदार अशोक नेते, अप्पर प्रधान वनसंरक्षक एम.श्रीनिवास राव, वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर, जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार, वनकर्मचारी हरिष दहागावकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी राष्ट्रीय वन हुतात्मा स्मारकाचे खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते शाही थाटात व विधिवत उदघाटन करण्यात आले, तदनंतर मान्यवरांच्या शुभहस्ते वनहुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आले.
प्रास्ताविक प्रभाकर आनकरी यांनी तर सूत्रसंचालन पूर्वाताई दोंतूलवार यांनी केले. उपस्थितांचे आभार वन उपविभागीय अधिकारी नितेश देवगडे यांनी मानले.
कार्यक्रमात वनअधिकारी, वनकर्मचारी, वनप्रेमी, वनसेवेत कार्यरत असतांना जीव गमावलेल्या परिवारातील सदस्य, प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close