ताज्या घडामोडी

सरडपार येथे श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबीर संपन्न

नेरी येथून जवळच असलेल्या सरडपार येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ सरडपार व चिमुर तालुका राष्ट्रसंत तत्वज्ञान प्रचार व प्रसार समितीचे वतीने दि 12मे ते 19 मे 2026 पर्यंत आठ दिवसीय श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन मौजा सरडपार येथे करण्यात आले होते. सदर शिबिरात चिमुर तालुक्यातील व तालुक्या बाहेरील एकुण 45 शिबीरार्थ्यांनी भाग घेतला.या आठ दिवसीय शिबीरामध्ये

सामु.ध्यान,प्रार्थना,रामधुन,भजन,भाषण,योग प्राणायाम, सुर्य नमस्कार, लाठीकाठी, मैदानी खेळ,कराटे,संत महापुरुषांचे विचार ई.चे शिक्षण देण्यात आले.याकरिता प्रशिक्षक म्हणून गजानन आत्राम साखरा, सुमित टोंगे, विष्णू बारेकर, गजानन ठाकरे,पोर्णिमा ठाकरे यांनी जबाबदारी सांभाळली.या शिबिराचे समारोपीय कार्यक्रम दि 19 मे रोज मंगळवारला संपन्न झाला या कार्यक्रमात मुलांनी प्रात्यक्षिके,भजने, लाठीकाठी मैदानी खेळ सादर केले या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ राम गभणे, निलकंठ सुर्यवंशी,ह.भ.प.कापसे महाराज,प्रदिपपाल चौधरी,राजु डाहुले, विठ्ठलराव सावरकर,बाबाराव दोहतरे,जिवतोडे सर, प्रभाकर पिसे, परमानंद बोरकर, धनराज मेश्राम होते.या शिबिराचे आयोजन राष्ट्रसंत तत्वज्ञान प्रचार व प्रसार समितीचे वतीने आनंदराव कडुकार ,टिकारामजी वाघमारे ,वामन बोरकर ,दयावंत जांभुळे , नितेश वाकडे , हरिश्चंद्र धोंगडे , संजय ठाकरे , मंगेश मस्के, कमलताई गुडधे, यांनी नियोजन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद देवतळे यांनी केले तर आभार प्रकाश गोहणे यांनी मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close