ताज्या घडामोडी

नेरी येथे भव्य मोफत रोगनिदान व होमिओपॅथिक औषधोपचार शिबिर

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

नॅशनल अकॅडमी ऑफ होमिओपॅथी ब्रह्मपुरी, व्यापारी असोसिएशन नेरी, गुरुदेव सेवा मंडळ नेरी, व केमिस्ट असोसिएशन नेरी यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 24 डिसेंबर 2023 रोज रविवारला सकाळी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे जुनाट व असाध्य अशा वारंवार होणाऱ्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांकरिता मोफत रोगनिदान व होमिओपॅथिक औषधोपचार शिबिर आयोजित केलेले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. श्यामसुंदर माने (डीन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला ),डॉ. माधुरी माने(स्त्रीरोगतज्ञ अकोला),डॉ. विशाल इखार (होमिओपॅथिक तज्ञा नागपूर), डॉ. पल्लवी राजुरकर (होमिओपॅथिक तज्ञ नागपूर ),डॉ. सुशांत पिसे( नॅचरोपॅथी व होमिओपॅथिक तज्ञ नागपूर), दादाराव पिसे (अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ नेरी),डॉ. श्याम हटवादे (अध्यक्ष नॅशनल अकॅडमी ऑफ होमिओपॅथिक ब्रह्मपुरी ),डॉ. विशाल गजापुरे( होमिओपॅथिक तज्ञ ब्रह्मपुरी), डॉ. प्रभुदास चिलबुले( माजी अध्यक्ष नॅशनल अकॅडमी ऑफ होमिओपॅथिक ब्रह्मपुरी), डॉ.घनश्याम बिंझवे (माजी अध्यक्ष नॅशनल अकॅडमी ऑफ होमिओपॅथिक ब्रह्मपुरी) मनोहर नागोरावजी पिसे( ज्येष्ठ फार्मसीसट नेरी), मंगेश चांदेकर (अध्यक्ष व्यापारीअसोसिएशन नेरी) यांच्या उपस्थितीत व कारकमलाने संपन्न होत आहे.
या शिबिरात लहान मुले, तरुण-तरुणी ,स्त्रिया ,प्रौढ, वयस्कर रुग्णांवर औषधोपचार केले जातील .जसे त्वचारोग ,इसब, खाज, खरूज, गचकरण, इसबगोल, पित्त ,मुरूम, मसाज, पुरम, शरीरावर येणाऱ्या गाठी, स्त्रियांचे आजार ,पाळी न येणे, अनियमित मासिक पाळी किंवा जास्त ब्रदर स्त्राव, पाळी बंद झाल्याने होणारे दुष्परिणाम, मुले मुली वयात येताना चे आजार ,पोटाचे आजार, मलबद्धता ,ऍसिडिटी ,मुळव्याध, भगंदर ,अन्सर ,कावीळ, किडनी आजार, निद्रानास, मिर्गी, दमा, वारंवार होणारा जुनाट सर्दी खोकला, नाकातील अरयूद, वारंवार होणारी रक्ताची कमतरता, केस गळणे व पिकणे इत्यादी तसेच तंबाखू ,गुटखा, सिगारेट ,अल्कोहोल यांचे सेवन व त्यामुळे होणारे दुष्परिणाम होमिओपॅथिक औषधे कमी होऊन ,रोग्यास व्यसनमुक्त होण्यास मदत करतो. मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून वारंवार होणाऱ्या कष्ट साध्य व असाध्य रोगांपासून रुग्णांची सुटका करणे हेच होमिओपॅथिक औषधाचे वैशिष्ट्ये व गुणधर्म आहेत या शिबिराला तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून त्यांच्याद्वारे औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त रुग्ण बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ.श्याम हटवादे ,डॉ. प्रवीण झाडे, डॉ.प्रशांत शिवरकर, डॉ.जगदीश पिसे ,डॉ. ऋतुजा निमजे,डॉ. मदनकर ,डॉ. प्रणय कुंभारे तथा आयोजक यांनी केलेली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close