ताज्या घडामोडी

श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी

माजलगाव – राजमाता जिजाऊ यांची ४२४ वी व स्वामी विवेकानंद यांची १५९ वी जयंती येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय माजलगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह अमरनाथ खुर्पे, शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, उपमुख्याध्यापक विजेंद्र चौधरी सर, पर्यवेक्षक उमेश थाटकर, कमलाकर झोडगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, आभार व सुत्रसंचालन उपमुख्याध्यापक विजेंद्र चौधरी सर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close