भिसी ग्रामपंचायत ची रद्द केलेली निवडणुक पुन्हा घेण्यात यावी

= नानाभाऊ नंदनवार शिवसेना शहर प्रमुख भिसी यांची मागणी .
= उपविभागीय अधिकारी चिमूर याना दिले निवेदन.
मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
चिमूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली भिसी ही एकमेव ग्रामपंचायत आहे मागील 6 महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यात भिसी ग्रामपंचायती ची सुद्धा निवडणूक कार्यक्रम लागला होता आणि उमेदवारांचे नामांकन भरणे सुद्धा सुरू झाले होते परंतु भिसी येथील काही लोकांनी भिसी नगर पंचायत होणार आहे म्हणून ग्रा. प. निवडणूक कार्यक्रम रद्द केला व उमेदवारास फार्म उचलण्यास भाग पाडले तेव्हा सदर ग्रा. प. ची पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी नानाभाऊ नंदनवार भिसी शिवसेना शहर प्रमूख तथा माजी तालुका शिवसेना प्रमुख व शिवसेना तालुका प्रमुखांनी केली आहे
सविस्तर असे की चिमूर तालुक्यात भिसी हे सर्वात मोठे शहर व गाव असून या गावाला सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे इथे सर्वात जास्त सदस्य संख्या असलेली तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नावारूपास आहे सदर ग्रामपंचायतीची निवडणूक मागील 6 महिन्यांपूर्वी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत लागली होती परंतु भिसी येथील काही नागरिकांनी भिसी नगरपंचायत बनणार आहे अशी अफवा पसरविण्यात आली आणि नगर पंचायत होणारच आता ग्रामपंचायत निवडणुका घेऊ नका असे सांगितले आणि या ग्रा. प. निवडणूक साठी ज्या उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते त्यांचे नामांकन वापस काढायला लावले यात सर्व उमेदवारांनी नामांकन वापस घेतले पण अजून पर्यंत भिसी नगर पंचायत ची हवा नाही यानंतर शासनाने या ग्रामपंचायतीवर गावाचे देखभाल कारभार करण्यासाठी प्रशासक ची नियुक्ती केली परंतु प्रशासक नेहमीच गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे त्यांचे कार्यालयीन कामकाज दाखले कागदपत्रे याची पूर्तता होत नाही नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या ग्रामपंचायत चे ग्रामविस्तार अधिकारी श्री संजय ठाकरे सुद्धा हजर राहत नाही त्यामुळे लोकांची अनेक कामे खोळंबली असून काहींची कामे झालीच नाही नागरिकांना अनेकदा कागदपत्रे पासून वंचित राहावे लागले आहे तेव्हा हा त्रास कायमचा दूर करण्यासाठी प्रशासनाने पुन्हा भिसी ग्रामपंचायत ची निवडणूक घेण्यात यावी आणि लोकांना होणाऱ्या त्रासातून बाहेर काढावे अशी मागणी नाना नंदनवार शिवसेना शहर प्रमुख भिसी यांनी निवेदना द्वारे केली आहे .
यावेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख भाउराव ठोबरे शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते माजी उपविभाग प्रमुख उदेभान राऊत व रोशन जुमडे उपस्थित होते