ताज्या घडामोडी

स्व.प्रसाद राऊत स्मृती चँरीटेबल ट्रस्ट नागभीड च्या वतीने रंगारंग’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

प्रजासत्ताक दिनी स्व.प्रसाद राऊत स्मृती चँरीटेबल ट्रस्ट नागभीड च्या वतीने दरवर्षी २६ जानेवारी ला शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ‘रंगारंग’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होतो . या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांनाही उत्सुकता असते. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोविड-19 मुळे हा कार्यक्रम साजरा होऊ शकत नसल्याने मागील वर्षांपासून छोटेखानी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला जात आहे…!!
आज स्व.प्रसाद राऊत यांना श्रद्धांजली अर्पित करून ट्रस्ट च्या वतीने मास्क वितरण करण्यात आले . तसेच ट्रस्ट च्या वतीने यावर्षी गरजुना गादी,ब्लॅंकेट,बेडशीट सेट देण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला. मागील वर्षी वृद्धांना बांबु काठीचे वितरण करुन सामाजिक दायीत्वाचे भान जोपासले होते. यापुढे दरवर्षी रंगारंग व्यतिरिक्त सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय करण्यात आला.
यावेळी नागभीड नगरपरिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ. उमाजी हिरे , जि.प.सदस्य संजय गजपुरे, नगरपरिषद उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, प्रा.डॉ. मोहन जगनाडे सर, नोटरी भारत सरकार ऍड.रवींद्र चौधरी, सिनेट सदस्य अजय काबरा,मोहन पंत, ट्रस्ट चे संचालक विनोद वरखडे,पवन नागरे,सतीश मेश्राम, ओमप्रकाश मेश्राम, अमोल वानखेडे,पंकज गरफडे,पराग भानारकर, प्रशांत घुमे,रोमी कटारे,प्रशांत बोरकुटे,गुलाब राऊत,क्षितिज गरमळे,पवन फुकट,सतीश जीवतोडे,अक्षय जीवतोडे , नरेश राखडे, निखिल रामटेके , तेजस पंत , कुणाल तुपट यांची उपस्थिती होती..!!!!!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close