चिमूर तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थेवर भाजपचे सर्व 13 उमेदवार अविरोध

च
कार्यसम्राट आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे कुशल नेतृत्व
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चिमूर तालुका शेतकी खरेदी विक्री सहकारी संस्थाच्या निवडणुक जाहीर झाली हॊती मात्र आधीच चिमूर विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे नेतृत्वात तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजयजी डोंगरे, भाजपचे सहकार आघाडीचे नेते दत्तूजी पिसे यांच्या मार्गदर्शनात सर्व तेरा ही उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. एकेकाळी या संस्थेवर काँग्रेस सत्ता गाजवायची मात्र आता काँग्रेसला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही, हे विशेष !
विजयी उमेदवारामध्ये संजय डोंगरे, दत्तूजी पिसे, सतीश आष्टनकर, विकास मासुरकर, बंडू समर्थ, गजानन चांदेकर, लिलेशवर पिसे, रामदास सहारे, जगदीश पिसे, सुनील नागदेवते, मदन शिवरकर, सौ. शशिकला पिसे, सौ. प्रेमीला पिसे यांचा समावेश आहे.
अविरोध आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.









