ताज्या घडामोडी

सौ. मिराताई दादासाहेब टेंगसे यांची विद्यापीठाच्या सदस्यपदी निवड

मराठवाडयातून एकमेव निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन व दुग्ध विकास सभापती सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे प्रतिकुलपती सुनिल केदार यांनी विद्यापीठाच्या कार्यकारणी परिषदेच्या सदस्यपदी मराठवाड्यातून एकमेव सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन व दुग्ध विकास सभापती पदाचा पदभार स्विकारल्यानंतर सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांनी जिल्हयात विकास कामाबरोबरच शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा जिल्हाभरातील शेतकरी व पशुपालकांना लाभ मिळवुन दिला.तर कोरोना काळात जनावरांना उद्भवलेल्या लम्पी सारख्या संसर्गजन्य आजाने गावागावात मोठ्या संख्येने जनावरे बाधीत झाली असतांना हा आजार जिल्हयातून हद्यपार करण्यासाठी नियोजन पध्दतीने गावागावात या आजारावरील दक्षता व उपाययोजने संदर्भात जनजागृती कार्यक्रम राबवुन लसीकरण शिबीरांचे आयोजन केले व जास्तीत जास्त जनावरांचे लसीकरण करुन लम्पी सारखा आजार जिल्ह्यातून कायम हद्दपार केला.राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत लाळया खुरुकुते रोगाच्या लसीकरण मोहिमेत अंतर्गत जिल्हयातील जनावरांनाची इनाफ या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंद व त्यांचे टॅगींग हा कार्यक्रम जिल्हयाभरात यशस्वीरीत्या राबवला यासह शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्हयातील शेतकरी व पशूपालकांना मिळवुन दिल्याने सभापती सौ मिराताई दादासाहेब टेंगसे यांच्या या उत्कृष्ठ कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ.बाबाजानी दुर्रानी व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या शिफारशी वरून जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन व दुग्ध विकास सभापती मिराताई दादासाहेब टेंगसे यांची मराठवाडयातून एकमेव महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर च्या कार्यकारणीवर सदस्य म्हणून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री ना.सुनील केदार यांनी नियुक्ती केली आहे. निवडीचे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले असुन या निवडीबद्दल जिल्हाभरातून त्यांचे स्वागत होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close