ताज्या घडामोडी

महावितरण चिमूर कार्यालयाच्या डेप्युटी इंजीनियर, जयूनिर इंजीनियर व नळ जोड़नी कन्ट्रादारावर गुन्हे दाखल करून तत्त्काल निलंबित करा

= चिमूर तालुका युवक काँग्रेसचे निखिल डोईजड़ यांची मागणी,

= कार्यकारी अभियंता चंद्रपुर याना निवेदन सादर

तालुका प्रतिनिधी :मंगेश शेंडे चिमूर

महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनी चिमूर कार्याल्याचे डेप्युटी इंजीनियर व जयूनिर इंजीनियर व नळ जोड़नी कंट्राटदार यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबित करण्याबाबत चिमूर तालुका युवक कांग्रेस च्या वितिने कार्यकारी अभियंता चंद्रपुर याना निवेदन देण्यात आले,
चिमूर नगर परिषद परिसरात MGF मार्फ़त कट्राटदार नळ कनेक्शन जोड़नी यांच्या चिमूर शहरामधे पाईपलाईन टाकन्याचे काम सतत 3 महिन्या पासून सुरु आहे. या कामाकरिता नळ पाईपलाइनचे PVC पाईप जोड़नी करीता व ठिकठिकाणी बेंड किवा टी जोड़ताना विद्युत आवश्यक आहे. सदर कंपनी कंट्राटदाराने विजेची कोणतेही उपकरन न आनता चिमूर विद्युत विभागाचे जेई व इंजीनियर यांचेसी संगनमत करून स्वताचे आर्थिक हित साध्य करून घेण्याकरीता विधुत कंपनीच्या विधुत खामबावरुन प्रवास सुरु असलेल्या त्या ठिकानावरुण अवैध मार्गाने ताराचा गुंडा टाकून विज चोरीचे उपक्रम सुरु आहे, यासाठी अनेक वेळा तोंडी सूचना करुंनही यानी तक्रारिकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चोरिसरख्या गंभीर गुन्ह्यास अटकाव न घालता मदत करून शाषणाची लाखो रूपयाने फसवणूक केली आहे. असा आरोप चिमूर तालुका युवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष निखिल डोईजड यानी केला असून या संदर्भात कार्यकारी अभियंता चंद्रपुर याना निवेदनाद्वारे दोषी अधिकार्यावर गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी असी मागणी करण्यात आली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close