भारतीय स्वातंत्र्याच्या 75 अमृतमहोत्सव अंतर्गत आष्टी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वतीने गावात भव्य रॅली
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बुधवार गुरुवार (ता.11)विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत असून जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात,स्वातंत्र्य संग्रामातील ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांचे व स्वातंत्र्य लढ्यात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ता. 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या सुचनेनुसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून प्रभात फेरी द्वारे जनजागृती करण्यात आली.
प्रारंभी प्राचार्य एल. के. बिरादार व आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी अमृतमहोत्सव 75 याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन फेरीसाठी सुचना दिल्या.फेरी दरम्यान गावातील मुख्य रस्त्यावरुन विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा झेंडा,घोषवाक्याचे फलक घेत वातावरण निर्मिती केली.यावेळी गावातील अनेक नागरिकांना तिरंगा ध्वज देण्यात आले. कार्यक्रम करण्यासाठी प्राध्यापक,शिक्षकांनी परिश्रम घेतले.