ताज्या घडामोडी

दिव्यांग बांधवांच्या मागण्या संदर्भात प्रश्नाचे लेखी उत्तर न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा

दिव्यांग बांधवांच्या मागण्या संदर्भात प्रश्नाचे लेखी उत्तर 9 मार्च 22 पर्यंत लोहा तहसिलदार साहेबांनी न दिल्यास 13 मार्च 22 ला जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आंदोलन करण्याचा चंपतराव डाकोरे पाटील यांचा निवेदनाद्वारे इशारा

उपसंपादकःविशाल इन्दोरकर

दिव्यांग बांधवाना लोहा
तहसिल कडुन हक्क तर मिळत नाहीच पण निवेदनाचे साधे उत्तरसुद्धा मिळत नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयाकडून निवेदनाद्वारे माहिती व हक्क दि 9 मार्च 22 प्रर्यंत देण्यात यावे म्हणून तहसील कार्यालय लोहा येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेले असता ऑफिस मध्ये तहसिलदार, नायाब तहसीलदार ऊपस्थित नसल्यामुळे
कार्यालयीन अधिक्षक मॅडम यांना निवेदन देण्यात आले. चर्चा करण्यासाठी कार्यालयात संबधित अधिकारी उपस्थित नव्हते.
कर्तव्यदक्ष तहसिलदार साहेब यांनी दिलेल्या मुदतीत माहिती द्यावी. माहिती न मिळाल्यास न्याय हक्कासाठी
दि 13 मार्च 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शेकडो दिव्यांग खालील मांगन्यासाठी प्रशासन विरोधात बोम मारो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मागण्या:-

1) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी:
दिव्यांग बांधवाना सर्वसामान्य जनते सारखे जीवन जगता यावे म्हणून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावा म्हणून दिव्यांग हक्क 2016 च्या कायद्याची
अंमलबजावणी व्हावी म्हणून आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाच्या ग्रामसभा किंव्हा बैठकीत दिव्यांग कायद्याची माहिती दिली?

2) दिव्यांग मित्र अॅप नांदेड:
दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्याकरीता ‘दिव्यांग मित्र अॅप नांदेड’ ची निर्मिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व माजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली व एकही दिव्यांग वंचित राहू नये वेळेचे बंधन वेळापञक १४जुलै ते ३१ जुलै २० नाव नोंदणी व दि .१ आँगस्ट ते १०आँगस्ट २० पर्यंत छाननी व १५ आँगस्ट २० ला लाभ देण्याचे व एकहि दिव्यांग वंचित राहिल्यास कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आपल्या सहित तलाठी यांना आदेश दिले असता अठरा महिन्यात आपल्या तालुक्यातील किती तलाठी आदेशाची अंमलबजावणी करून किती दिव्यांगाची दिव्यांग मिञ अँप मध्ये नोंदणी, मंजुरी, किती दिव्यांगाना लाभ दिला? वरिष्ठांचे वेळापत्रक व आदेश न मानणारे अधिकारी यांच्यावर आपण काय कार्यवाही केली? त्याची यादीसहित माहिती त्वरित देण्यात यावी.

३) दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदान वेळेवर का मिळत नाही यांच्या कारणासहित माहिती द्यावी

4) तहसील मार्फत मिळणाऱ्या अनुदान पात्र करण्याची मिंटिग दरमहा का होत नाही? मिंटिंग मध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांना सहा ते सात महिने अनुदान का मिळत नाही? मंजुर झाले की अपात्र हे लाभार्थ्यांना का कळविले जात नाही? याची माहिती देण्यात यावी

5) तहसिल मार्फत अनेक योजनेत मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुर झालेल्या महिन्यापासून अनुदान दिले जाते कि त्यांचा नियम कसा आहे त्यांची माहिती देण्यात यावी

6) संजय गांधी व ईतर योजनेत कमिटी का करण्यात आली नाही? त्यात दिव्यांग बांधताना स्थानिक कमेटित का घेतले जात नाही?

7) खासदार निधी:
दरवर्षी विस लाख दिव्यांगांना स्थानिक मतदार संघात खासदार निधी २०१६ पासुन का मिळत नाही?

8) आमदार निधी:
पंधरा लाख दरवर्षी दिव्यांगाना स्थानिक मतदार संघात आमदार निधी २०१६ पासुन का मिळत नाही?

9) अंत्योदय राशन योजना:
दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय राशन कार्ड देण्याची शासन तरतूद आहे. आपल्या तहसिल मार्फत किती दिव्यांगाना याचा लाभ दिला किंव्हा दिला नाही यांचे कारणासहित माहिती लाभार्थी यादी द्यावी.
वरील दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी वरील मागण्यांचे निवेदण दि 15 फ्रेबु 22 रोजी लोहा तहसिलदार यांना शिष्टमंडळ दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,ता सचिव शेख हानिफ,
संतोष मोरे, लिंबाजी लिंबटकर, महाविर अच्युत, शेख मेहबूब,
संदिप चव्हाण ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close