रेखा मनेरे कर्तृत्वान महिला पुरस्काराने सन्मानित

जागतिक महिला दिनानिमित्त परभणी येथे सावली सभागृहात कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 28/03/2026रोजी
परभणी येथे वरीष्ठ उद्योजक अधिकारी महिला यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
रेखा मनेरे ह्या पाथरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेत्या तथा दैनिक कलमवीर तालुका प्रतिनिधी पाथरी/ मानवत या मध्ये महिला पत्रकार म्हणून काम करतात तसेच सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा , झेप उद्योगीणी यांच्या वतीने परभणी येथे ॑सावली सभागृह वसमत रोड येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विविध क्षेत्रात बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी तसेच सर्व सामान्य महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, खाद्यपदार्थ,बनऊन उद्योग सुरू करून स्वावलंबी बनविण्यासाठी परिश्रम व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम शोभा इक्कर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला जेष्ठ उद्योजिका पोर्णिमा श्रीशेखर , यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्तेत्या
रेखा मनेरे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. त्यांचे कार्य समाजातील इतर सर्व महिलांना प्रेरणादायी आहे.तसेच जेष्ठ उद्योजीका मा. पोर्णिमा श्रीशेखर मॅडम यांच्या हस्ते कर्तुत्ववान महिला, पुरस्कार देऊन पाथरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेत्या रेखा मनेरे यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करून गौरविण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा .केरवन वैष्णव सर , सौ.वनिता चव्हाण,सौ.सविता बाहेकर,सौ.सुमित्रा लिंगायत, सौ कोमल चव्हाण,सौ.अनुराधा पोटेकर,सौ.किरण गणेश वर्मा,फरीदा बेगम जब्बार खान, रेश्मा बेगम मोहम्मद खैसर, गंगासागर खिल्लारे, सौ. प्रभावती सावंत, मीरा सरनाईक,व इतर सर्व महिला महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या








