भिसी येथील लोकशाहीर चमुसह आकाशवाणीवर

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
चिमुर तालुक्यातील भिसी येथील, प्रबोधन कला मंच यांचे लोकशाहीर प्रबोधन प्रकाशबाबु वाळके व त्यांच्या चमुसह लोकसेवा प्रसार आकाशवाणी केंद्रा अंतर्गत लोकसंगीत वऱ्हाडी गीतांचे प्रसारण दि ३ व १० एप्रिल २०२६ रोज शक्रवार ला सायंकाळी ०८:१५ वाजता आकाशवाणी केंद्रावर प्रसारीत करन्यात येत आहे.
लोकशाहीर प्रकाशबाबु वाळके हे अनेक वर्षापासून समाजप्रबोधन करीत आहेत. विविध समाज प्रबोधन कार्यक्रमातून ते समाजिक समाजातील अंधश्रद्धा,अनिष्ठ-चालिरीती रुढी परंपरा, व्यसनमुक्ती, स्त्रीभुणहत्या. ग्रामस्वच्छता अभियान अशा विविध विषयांवर जनजागृतीचे कार्य करीत आले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक सेवाभावी संस्थेनी त्यांना पुरस्कृत केले आहेत.
लोकशाहीर प्रबोधनकार प्रकाशबाबु वाळके, सहगायक – सुमेध बैले, तबला वादक – देविदास कातकर, हार्मोनियम वादक – सिद्धांत बैल, नालवादक – दयाल गेडाम व कोरस – गौतम खवसे या कलावंताचा सामाजिक कार्यात तितकाच मोलाचा वाटा आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गीत, माय वऱ्हाडी गीत, शेतकरी गित, वृक्षारोपण, पर्यावरण,पाण्याच्या समास्यांवरील जनजागृती अशा विविध विषयांवरील गिते आकाशवाणी केंद्रा अंतर्गत प्रसारीत होणार आहे. तरी यांची समस्त कला प्रेमिंनी नोंद घ्यावी हि विनंती.









