गोंडपिपरी मार्गावर हायवा आणि बुलोरोच्या भीषण अपघात
वाहन चालकासह दोन गंभीर जखमी.
तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
दि.27 एप्रिल रोज बुधवार ला रात्रौ 10 वाजताच्या सुमारास गोंडपीपरी मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ बुलेरो व हायवा ट्रॅक वाहनाचा भीषण अपघात घडला यात बुलेरो वाहनाचा समोरील चाक चक्क बाहेर निघाला . सदर अपघातात बुलेरो वाहन चालकास अन्य दोन जखमी झाले आहे.
जखमीना ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लग्न सोहळा आटपून गोंडपीपरी मार्ग आष्टि कडे बुल्लोरो वाहन क्रमांक MH 13 CS 4385 येत असताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रक क्रमांक मग 40 ब्ल 3998 वाहनाचा भीषण अपघात घडला.
यात बुलोरो वाहनाचा समोरचा टायर बाहेर निघाला आणि वाहनाचा समोरील भाग क्षतीग्रस्त झाला आहे. जबर धडक बसल्याने हायवा ट्रक वाहनाची डिझेल टॅंक फुटली.
अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीना दवाखाण्यात दाखल केले.तर काही टवाळ्क्या करणारी मुले हायवा वाहनाची डिझेल टंकी फुटल्याने प्लॅस्टिक ची कॅन आणून डिझेल चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले.
वृत्त लिहेपर्यंत जखमींची ओळख पटली नाही.