ग्रामीण रुग्णालय पाथरी येथे रुग्ण कल्याण समितीच्या नियामक बैठक संपन्न
प्रतिनिधी:-अहमद अन्सारी परभणी
दिनांक 30/07/2024 रोजी ग्रामीण रुग्णालय पाथरी जिल्हा परभणी येथे रुग्ण कल्याण समितीच्या नियामक बैठक पार पडली.
सदरील बैठकीस रुग्ण कल्याण समितीचे स्वीकृत सदस्य श्री.अनीलराव सखारामजी नखाते साहेब ,श्री.सदिशिवजी नाथा थोरात साहेब,श्री. अली अफसर अली अकबर अन्सारी साहेब तसेच रुग्ण कल्याण समितीचे जिल्हा समन्वयक श्रीमती गीता मोरे, गट विकास अधिकारी मा.श्री.यादव साहेब ,बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती मंगला गायकवाड ,नगर परिषद पाथ्री चे ओ एस श्री.प्रसाद पोटे साहेब आदी उपस्थित होते.बैठकीची सुरुवात सर्व सन्माननीय सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्रस्तावना रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुमंत वाघ यांनी केले.बैठकीत दरम्यान सन्माननीय सदस्यांनी रुग्णालय,स्टाफ व रुग्णांशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा केली.
तसेच जिल्हा स्तरावरून उपलब्ध करण्यात आलेल्या वॉटर कुलर,वॉटर प्युरिफायर चे उद्घाटन माननीय सदस्यांचे हस्ते करण्यात आले.
रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात उपलब्ध औषधी साठा दर्शविणाऱ्या फलक चे उद्घाटन माननीय सदस्यांचे हस्ते करण्यात आले. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उपचार बरोबर औषधाची उपलब्ध स्थिती कळावी म्हणून डॉ.नागेश लखमावर , जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा रुग्णालय परभणी यांच्या मार्गदर्शन तसेच रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.सुमंत यांच्या संनियांत्रखली सदरील फलक बसविण्यात आले.
सदरील उपक्रमा बद्दल सर्व सन्माननीय सदस्यांनी कौतुक केले तसेच अभिनंदन व्यक्त केले.