ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला कराळे मास्तरांची शाळा

मित्रसेवा ग्रुप च्या कार्यक्रमात हजेरी

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

दि:२१फेब्रुवारी
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मित्रसेवा ग्रुप वरोरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्धा येथील प्राध्यापक नितेश कराळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध परीक्षासाठी मार्गदर्शन करतांना आपल्या विदर्भातील भाषेने विद्यार्थ्यांना गमतीदार पध्दतीने शिकविणाऱ्या प्राध्यापक कराळे सर यांना ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात शेतकऱ्यांपासून व्यापारी पर्यंत सर्व समाज सुखात नांदत होता .केंद्र सरकार किंवा राज्य सरकार जर विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणत असेल तर रस्त्यावर उतरून स्वतः च्या हक्कासाठी लढा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव डहाने, प्रमुख अतिथी म्हणून नितेश कराळे ,फिनिक्स अकॅडमी वर्धा ,मोरेश्वर टेमुर्डे , माजी विधानसभा अध्यक्ष ,प्रा. जावेद पाशा ,निखिल अंबाडरे यांनी मार्गदर्शन केले.मित्रसेवा ग्रुप चे अध्यक्ष शरद पुरी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी केला.या कार्यक्रमाचा शेवट मसालेभात वाटप करून केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
रोहित मोलगुरी,कपिल बांदुरकर,अनिकेत जुनघरे,सुजन मांढरे,आकाश रंदळे,प्रशांत बदकी ,रितिक चिंचोलकर,रोहन हनवते,अनिकेत श्रीरंग,जयराम नैताम ,सूरज गेडाम,आदर्श हांडे, रोहित खिरटकर,रोहित घाटे,कुंदन मेश्राम, संस्कार कोरेकार,निसार शेख,शाहरुख शेख,धिराज गायकवाड,विनीत आमटे मयूर तितरे,विराज काटकर ,अभिजित अष्टकार इत्यादी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close