राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ.बाबाजाणी दुर्राणी यांचा साईबाबाची मुर्ती देऊन केला सत्कार
आ.दुर्राणी यांनी पाठपुराव्यातून श्री साईबाबा तिर्थक्षेत्र विकासासाठी मिळवला ९१ कोटी ८० लाख रुपये निधी.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यक्रम.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आ.बाबाजाणी दुर्राणी यांच्या पाठपुराव्यातुन पाथरी येथील श्री साईबाबा जन्मभूमीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी जमीन अधिग्रहणासाठी चा निधीस छत्रपती संभाजीनगर येथील १६ सप्टेंबर रोजी च्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत ९१ कोटी ८० लाख रूपये निधीस मंजुरी मिळाली त्याबद्दल पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत रवीवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ.बाबाजाणी दुर्राणी यांचा साईबाबा ची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.
श्री साईबाबा मंदिर विस्वस्त तथा आ.बाबाजानी दुर्राणी मागील चार वर्षांपासून पाथरी येथील श्री साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी संसद सभागृहात व शासन दरबारी सतत्याने पाठपुरावा करीत तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवला. त्यानंतर विकासकामासाठी तत्कालिन सरकारने निधी मंजुरीबाबतची घोषणा केली होती. त्यासाठी पाथरी नगरपालिका व जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी तीन वेळा श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुधारित धर्तीवर तिन वेळा राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. प्रस्तावित आराखडा संभाजीनगर येथे होणाऱ्या १६ सप्टेंबर रोजीच्या विशेष मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर विषय आणला त्यास तत्वतः सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि या मंत्रीमंडळाच्या बैठकीत ९१ कोटी ८० लाखाचा निधी मंजूर झाला.कृतज्ञता म्हणून रवीवारी पाथरी बाजार सभापती अनिलराव नखाते यांचे हस्ते आ.बाबाजाणी दुर्राणी यांना साईबाबा ची मुर्ती भेट देऊन सत्कार केला.याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक दत्तराव मायंदळे,उपसभापती शाम धर्मे,नारायणराव आढाव,नितिन शिंदे बाजार समिती संचालक अशोक आरबाड, रामप्रसाद कोल्हे ,गणेश दुगाणे, आनंद धनले ,सय्यद गालेब, अमोल बांगड,विष्णुपंत काळे,बालासाहेब गिराम, शेख दस्तगीर यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.