ताज्या घडामोडी

श्रीमती शांताबाई नखाते विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन

जिल्हाधिकारी आँचल गोयल यांचे हस्ते उद्घाटन ; अध्यक्षस्थानी आ.बाबाजाणी दुर्राणी.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय,शिवाजी नगर पाथरी येथे मंगळवारी सायंकाळी ६ वा।वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले आहे.
जिल्हाधिकारी आँचल गोयल यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. तर अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुर्राणी हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहूणे म्हणून उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी,तहसीलदार सुमन मोरे,
पोलीस निरीक्षक गणेश राहीरे ,वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलराव नखाते यांची उपस्थिती राहणार आहे.याप्रसंगी देशभक्तीसह ईतर गितावर बालकलाकार हे सर्वांगसुंदर असा कलाविष्कार सादर करणार आहेत.वेशभूषा या संमेलानाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
येथे १ ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात.१० वी व १२वी च्या निकालाची उज्ज्वल परंपरा,स्पर्धा परिक्षेत विद्यार्थ्यांचे यश ,शैक्षणिक सहल,आद्यावत अटल टिंकरींग लँब व सुसज्ज ग्रंथालय ह्या बाबी वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
हे वार्षिक स्नेहसंमेलन वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा भावनाताई अनिलराव नखाते ,माध्यमिक मुख्याध्यापक के. एन. डहाळे प्राथमिक मुख्याध्यापक एन.ई. यादव यांचे संयोजनाखाली होत आहे.यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

बाल विवाह मुक्त साठी जनजागृती…
जिल्हाधिकारी यांनी बाल विवाह मुक्त परभणी जिल्हा या मोहीमेत श्रीमती शांताबाई नखाते विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी समाजीक दायीत्व भावनेतून जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा,याशिवाय चाईल्ड लाईन १०९८ क्रमांक ,बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अशा सर्व प्रकारची माहीती नागरीकांपर्यंत पोहचविण्याच्या मोहीमेत श्रीमती शांताबाई नखाते विद्यालयाचा मोलाचा सहभाग आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close