ताज्या घडामोडी

चारगाव (बु) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथा क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले जयंती महोत्सव चारगांव बु.येथे दि.13/04/22 ते 14/04/22असा दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन पंचशील बौद्ध महिला मंडळ तथा ग्रामवासी चारगांव बु.द्वारे करण्यात आले होते. दि.13/04/22 ला सांयकाळी भिमबुद्ध गीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर दि.14/04/22सकाळच्या सत्रात ध्वजारोहण व बुद्धपुजापाठाने सुरुवात करण्यात आली.दुपारच्या बौद्धिक सत्रात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगीराज वायदुळे(सरपंच चारगांव बु.)तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.विजय गाठले यांनी भारतीय संविधानाने तमाम भारतीयांंचा मार्ग सुखकर व सुरक्षित केलेला आहे, परंतु या संविधानाच्या संरक्षण, संवर्धन व सक्षमीकरणाची जबाबदारी मात्र संपूर्ण भारतीय जनतेची आहे असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून राजेंद्र थुल(पोलीस पाटील चारगांव बु),छगनराव आडकीने(अध्यक्ष त.मु.समिती. चारगांव बु.) उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सांगता संविधान वाचनाने करण्यात आली. सांयकाळी धम्मरँली चे आयोजन करण्यात आले होते.अत्यंत शांततामय वातावरणात रँली चा सांयकाळी १०वाजता समारोप करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close