ताज्या घडामोडी

श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
या वेळी विज्ञान प्रदर्शन, चित्र प्रदर्शन तसेच निबंध स्पर्धा घेऊन विज्ञान सप्ताह अंतर्गत सर्व उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सांघिक पद्य व डॉ सी व्ही रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी अध्यक्ष उपमुख्याध्यापक विजेंद्र चौधरी सर, प्रमुख पाहुणे प्रा डॉ विकास बोरगावकर, विश्वनाथ फुपाटे तर व्यासपीठावर पर्यवेक्षक उमेश थाटकर, रवींद्र खोडवे,अभ्यासपूरक मंडळ प्रमुख श्रीमती सुनंदा खांडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा डॉ विकास बोरगावकर व विश्वनाथ फुपाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप विजेंद्र चौधरी सर यांनी केले तर आभार चेतन धुरंधरे, सुत्रसंचालन श्रीमती पल्लवी कानडे यांनी केले.
हा कार्यक्रम ५ वी ते ७ वी विभागातही घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक कमलाकर झोडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती अंजली वाघमारे, विश्वनाथ फुपाटे तर व्यासपीठावर विभाग प्रमुख मिलिंद वेडे, अभ्यासपुरक मंडळ प्रमुख श्रीमती प्रज्ञा देशपांडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी माता सरस्वती, कुसुमाग्रज व डॉ सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी डॉ सी व्ही रमन यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला तसेच मराठी भाषेचे वैभव या विषयावर श्रीमती अंजली वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप कमलाकर झोडगे यांनी केले, प्रास्ताविक परमेश्वर आदमाने, आभार झुल्पे सर यांनी मानले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक उपकरणे, निबंध, चित्र तयार करण्यात आले होते त्याचे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात भरवण्यात आले होते. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close