तात्काळ पुनर्वसन करा निमगाव येथील जनतेची मागणी
प्रतिनिधी:नरेंद्र मेश्राम लाखनी
भंडारा तालुक्यातील पहेला येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव येथील गावाचे तात्काळ पुनवर्सन करण्यात यावे अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा इशारा निमगाव येथील ग्रामस्थांनी दिलेला आहे .याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोसे धरणाच्या बॅक वॉटर मुळे निमगाव गावाला तिन्ही बाजूने पाण्याने वेढले असून ज्या लोकांची शेती संपादित झाली नव्हती अश्या लोकांच्या शेतात सुद्धा पाणी आलेले आहे .उर्वरित शेती संपादित करून त्यांना सुद्धा शेतीच्या मोबदला देण्यात यावा .येथील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्याअसून येथील नळ योजना पूर्णपणे दूषित झालेले असून येथील पाण्याच्या टाकीजवळ अंदाजे 20 फूट पाणी साचलेले आहे . गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे .येथील जिल्हा परिषद शाळेजवळ बॅक वॉटर पाणी आले असून शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे .येथील मशानभुमी पाण्यात पूर्णपणे बुडाली असून गावातील प्रेतांचे अंत्यसंस्कार कुठे करावे हा सुद्धा गावकऱ्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे बंद झाले असून धानाची फसल कशी काढावी हा त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे.या गोसे धरणाच्या पाण्यामुळे गावात रोजगाराची समस्या सुद्धा निर्माण झाली आहे .गावात रात्री-बेरात्री किडे ,साप घरात येतात त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .शासनाने व प्रशासन यांनी गावकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्वरित गांभीर्याने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी घागर मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे येणार्या जिल्हा परिषद ,पंचायत पंचायत समिती समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे. याला संपूर्ण शासन प्रशासन जबाबदार असेल असे येथील सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे ,माजी सरपंच देवचंद सिडाम ,सरपंच शीला राऊत ,तंटामुक्ती समिती अध्यक्ष कृष्णा चवळे ,ग्रामपंचायत सदस्य राजकुमार राऊत, चंभूलाल मोटघरे ,खुशाल गाढवे , गीता धूळसे, विजू चौधरी, भगवान राउत, गीता धूळसे ,मुक्ता शिवणकर ,संगीता भोयर, प्रमिला भोयर ,गावातील सर्व गावकरी व महिला भगिनी यांनी दिलेला आहे.