ताज्या घडामोडी

विद्युत पोल उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

गंज लागून धोकादायक बनलेला विद्युत पोल बदलून नवीन पोल उभारणीसाठी पुढाकार घेणारे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर व सहकाऱ्यांचा राणीसावरगाव येथे रविवारी सत्कार करण्यात आला.
रेणुका नगर तांडा या सर्वाधिक बंजारा समाजाची वस्ती असलेल्या भागात एक विद्युत पोल गंज लागल्याने तो अर्ध्यातून पडून कधीही धोकादायक घटना घडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. युवा कार्यकर्ते शिरीष राठोड यांनी या संदर्भात विज महामंडळाचे अधिकाऱ्याकडे दोन वर्षांपासून चकरा मारणे सुरू ठेवले होते. मुदस्सीर या युवकांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली. बोबडे यांनी ही बाब महावितरणचे उपविभागीय अभियंता यांच्या कानावर घालून हा धोकादायक पोल बदलण्याची विनंती केली. यानंतर आठ दिवसात हा पोल हटवण्यात आला. या कामाबद्दल रेणुका नगर तांडा यांच्यावतीने सखाराम बोबडे पडेगावकर मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिदसे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सय्यद मुदशिर ,शिरीष राठोड गजानन जाधव, रहीम, बाळू राठोड आदींची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close