पाथरी आगारात सुरक्षितता अभियानाचे उदघाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी आगारामध्ये सुरक्षितता अभियानाचे उदघाटन पाथरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व ईश्वरी विश्वविद्यालय पाथरीच्या योगिता बहेनजी व डॉक्टर मुक्ता वाकनकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी अपघात होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता व आपण जे काम करतो ते आनंदाने व प्रामाणिकपणे केले पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच योगिता बहेनजी यांनी व्यसनामुळे मनावर ताबा राहत नाही व त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते व बहेनजी यांनी मी व्यसन करणार नाही याबाबत शपथ दिली तर डॉक्टर वाकनकर मॅडम यांनी अपघातामुळे जीवित हानी होऊन कौटुंबिक नुकसान होते. व व्यसनापासून दूर राहावे असेल मत व्यक्त केले. तर आगार व्यवस्थापक हणमंत चपटे यांनी अपघाताची कारणे नमूद केली. तर स्थानक प्रमुख गजानन येडले यांनी आभार व्यक्त केले.तर सदर कार्यक्रमासाठी आगारातील सवानी जाधव, आगार लेखाकार देशपांडे, पाळीप्रमुख अरबाड, व आगारातील चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते










