ताज्या घडामोडी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घरकुलाचे धनादेश अडकले

शहर प्रतिनिधी : संजय दडमल नेरी

संपुर्ण भारतासह सर्व जगात कोरोना महामारीने कहर केला आहे . तसेच संपुर्ण महाराष्ट्रासह चंद्रपुर जील्ह्यात कोरोनाची रूग्ण संख्या वाढतच आहे . चिमुर तालुक्यातील पंचायत समीतीमध्ये काही अधीकारी कोरोना बाधीत नीघाल्याने येथील सर्व काम ठप्प असल्याचे चित्र दीसुन येत आहे . त्यामुळे घरकुल अभीयंता घरकुलाचे जीओ टॅग करण्यासाठी फील्डवर जात नसल्याने घरकुल लाभार्थ्याचे धनादेश कोरोनामुळे अडकले आहे .
चिमुर पंचायत समीती अंतर्गत ग्रामीण भागात घरकुलाचे काम सुरू आहे . घरकुलाचे काम सुरू असतानी कोरोना महामारीने मार्च मध्ये कोरोनाची दुसरी लाट भारतात पसरली . त्यामुळे या लाटेमध्ये अनेकांची कुटुंबे उध्दवस्त झाली आहेत . या लाटेला थांबवीण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन लावले .
पण ही कोरोणाबाधीतांची संख्या घटता घटेना मे महीन्याच्या १० तारखेनंतर थोडी कोरोना बाधीतांची संख्या घटत असल्याचे दीसुन येत आहे . याचाच प्रकोप चिमुर तालुक्यातील पंचायत समीतीमध्ये दीसुन येत आहे . येथील काही अधीकारी कोरोना बाधीत नीघाल्याने काही दीवस पंचायत समीतीमधील कामे ठप्प पडली आहेत .येथील संवर्ग वीकास अधीकारीच होम क्वारंनटाईन होते . त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणारे अधीकारीही होम आयसोलेशन मध्ये आहेत . याच कारणामुळे घरकुल वीभागातील घरकुल अभीयंताचे काम ठप्प पडले आहे . ” जान हैं तो जहान हैं ! या मनीप्रमाणे अभीयंताचे घरकुलाचे जीओ टॅग करणे बंद असल्यामुळे घरकुलाचे धनादेश अडकले आहे . तर धनादेश अभावी काही लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम रखडले आहे .
कोरोना महामारीमुळे घर बांधण्यासाठी लागणारे सीमेंट , गीट्टी , लोहा , या साहीत्यांचे भाव सुध्दा वाढलेले आहे . त्यामुळे घरकुलाचे बांधकाम करणे या कमी अंदाजपत्रकामुळे कठीण जात आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close